भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीरामासी राज्याभिषेचन । इंद्रादिकां चिंता गहन । समस्त देवमिळोन । चतुरानन विनिविला

shriramasi rajyabhishechan | indradikan chinta gahan | samasta devamilon | chaturanan vinivila

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्रीरामासी राज्याभिषेचन । इंद्रादिकां चिंता गहन । समस्त देवमिळोन । चतुरानन विनिविला ॥१॥ देव म्हणती ब्रह्मायासी । तुझें आश्वासन आम्हांसी । श्रीराम अवतार सुर्यवंशीं । तो रावणासी वधील ॥२॥ सपुत्र बंधु प्रधान । राम करील राक्षसकंदन । तेणें देवासी बंधमोचन । एका जनार्दनीं होईल ॥३॥