भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम नाम वदे वाचे । धन्य मुख तयाचें लोटांगणीं साचे । हरिहर पैं येती

ram nam vade vache | dhanya mukh tayachen lotanganin sache | harihar pain yeti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
राम नाम वदे वाचे । धन्य मुख तयाचें लोटांगणीं साचे । हरिहर पैं येती ॥१॥ नाम चांगलें चांगलें । जड जीव उद्धरले । वैकुंठवासी केलें । कुडे कपाटियासी ॥२॥ अजमेळादि पातकी । नामें तारिलें महादोषी । यवनादि सुखी नामें केलें ॥३॥ हास्य विनोदें नाम । घेतं पावे सर्वोत्तम । मा दृढ धरलीया प्रेम । देवचि होय ॥४॥ एका जनार्दनीं अनुभव । कालीमाजीं तारक सर्व । नामवांचुनीं अन्यभाव । नाहीं नाहीं ॥५॥