भजनी मालिका

भजने

निरालंब देशींचा गुरुराया । धरें कां रे भाव चरणकमळीं ॥१॥ धरितांचि भाव नासतसे माया । त्यांचें स्वरुप ठाया वोळखावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निरालंब सहज माय पहातां कैसें । सबाह्म अभ्यंतर व्यापुनी पुर्ण अखंड दिसे । लक्ष वो अलक्ष पाहतां देहीं देह न दिसे । निर्गुण गुणसी आलें अवघें ब्रह्माचि दिसें ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

निराळा निराळा राहे तु सढळ । दृश्याचे पाल्हाळ मागें सारी ॥१॥ तेथे तीर्थ संन्यास घेई निश्चयाचा । मेरु होई सुखाचा सहजपणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निराशियाचे भेटी पाहे । वैकुंठींचा राव धांवे ॥१॥ निराशेपायीं न ये व्याधीं । निराशेपायीं सकळ सिद्धी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निरोप हा माझा सांगरे कृष्णाला । भरंवसा मजला आहे तुझा ॥१॥ अच्युता अनंता श्रीधरा वामना । अगा नारा-यणा शरण तुज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निर्गुण नामाची अनंत कल्पना । धरुनि नारायणा व्यक्ति येसी ॥१॥ लाज लावियेली त्या निर्गुणपणा । श्रुतींच्या वचना वाखाणितां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव