भजनी मालिका
← भजनांकडे परत

निराकृत्य कृत्य विश्वातें पोखितें

nirakrutya krutya vishvaten pokhiten

निराकृत्य कृत्य विश्वातें पोखितें । आपण उखितें सर्वाकार ॥१॥ तोचि हा सावळा डोळ डोळस सुंदर । रुक्मिणीभ्रमर कृष्ण माझा ॥२॥ निश्चळ अचळ । नाहीं चळ बळ । दीन काळ फळ हारपती ॥३॥ निवृत्ति सोपान खेचर हारपे । तदाकार लोपे इये ब्रह्मीं ॥४॥