भजनी मालिका
← भजनांकडे परत

निरालंब बीज प्रगटे सहज

niralamb bij pragate sahaj

निरालंब बीज प्रगटे सहज । तो गौळियांचें काज करी कृष्ण ॥१॥ हरि हा सांवळा वेधिलिया बाळा । माजि त्या गोपाला गायी चारी ॥२॥ वंदिती सुरगण ब्रह्मादिक चरण । तो यशोदेसि स्तन मागे हरि ॥३॥ निवृत्तीचें ध्यान मनाचें उन्मन । योगिया जीवन हरि माझा ॥४॥