भजनी मालिका
← भजनांकडे परत

निरालंब देशींचा गुरुराया । धरें कां रे भाव चरणकमळीं

niralamb deshincha gururaya | dharen kan re bhav charanakamalin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निरालंब देशींचा गुरुराया । धरें कां रे भाव चरणकमळीं ॥१॥ धरितांचि भाव नासतसे माया । त्यांचें स्वरुप ठाया वोळखावें ॥२॥ भाव अभावा विरहित साचे । तें रुप जयाचें हृदयीं ध्यावें ॥३॥ एका जनार्दनीं ऐसें जें रुपडें । हृदयीं चोखडें ध्याई जना ॥४॥