भजनी मालिका

भजने

दळणीं कांडणीं गाइन मंगळीं । कान्हों वनमाळी प्राणसखा ॥१॥ हरीचिया नामें हरती महादोष । तुटती कर्मपाश निमिषमात्रें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

दळणीं दळीतां आठवे मानसीं । अलंकापुरवासी ज्ञानराज ॥१॥ वोविया मंगळी गाईन तयासी । स्वामी तुकयासी निजानंदे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

दशमी व्रताचा आरंभु । दिंडी कीर्तन करा समारंभु । तेणे तो स्वयंभु । संतोष पावे ॥१॥ एकादशी जाग्रण । हरिपूजन नामकीर्तन । द्वादशी क्षीरापती जाण । वैष्णव जन सेविती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दशमीचे दिवशी केली प्रदक्षिणा । आणिक कीर्तना संत उभे ॥१॥ रात्रंदिवस त्यांही केला हरिजागर । हरिदिनीं थोर कृष्णपक्षीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दशमीचे दिवशीं ठेविलें प्रस्थान । साधियेला येणें देव गुरु ॥१॥ दिधला मंडप सिद्धेश्वरासमोर । उठावले भार वैष्णवांचे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दशरथ राजा उठिला तेथुनी । कौसल्ये सदनीं जातां झाला ॥१॥ पाहातसे दृष्टी तेव्हां श्रावणारी । न माये अंतरीं तेज निचे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दशरथ राजा संतान तें नाहीं । ह्मणोनियां पाही ऋषेश्वरीं ॥१॥ करूनि विनंति पुत्रेष्टी हे केली । पुरोडांश भक्षिली पत्नियांनीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दशरथें मारिला तोचि होता मास । वर्षाऋतु असे कृष्णपक्ष ॥१॥ वसुनाम तिथी बुधवार असे । शुक सांगतसे परी-क्षिती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दसरा दिवाळी तोचि आम्हां सन । सखे संतजन भेटतील ॥१॥ आमुप जोडल्या पुण्याचिया राशी । पार त्या सुखासी नाहि लेखा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम