भजनी मालिका
← भजनांकडे परत

दशमद्वार अग्रशून्य सूक्ष्म गगनीं

dashamadvar agrashunya sukshma gaganin

दशमद्वार अग्रशून्य सूक्ष्म गगनीं । जेथ आसे उन्मनी निखिल रुपे ॥१॥ द्विविध भाग पिंडी द्विविध ब्रह्मांडी । या तीं पडीपाडीं ब्रह्मरंध्रीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे शून्यांतील रुप । अनंत ब्रह्मांणे जेथ आहाती ॥३॥