भजनी मालिका
← भजनांकडे परत

दळितां कांडितां । तुज गाईन अनंता

dalitan kanditan | tuj gain ananta

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
दळितां कांडितां । तुज गाईन अनंता ॥१॥ न विसंबें क्षणभरी । तुझें नाम गा मुरारी ||२|| नित्य हाचि कारभार। मुखीं हरि निरंतर ||३|| मायबाप बंधुबहिणी । तूं वा सखा चक्रपाणी ॥४॥ लक्ष लागलें चरणासी । म्हणे नामयाची दासी ॥५॥