भजनी मालिका
← भजनांकडे परत

दशमीचे दिवशीं ठेविलें प्रस्थान । साधियेला येणें देव गुरु

dashamiche divashin thevilen prasthan | sadhiyela yenen dev guru

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दशमीचे दिवशीं ठेविलें प्रस्थान । साधियेला येणें देव गुरु ॥१॥ दिधला मंडप सिद्धेश्वरासमोर । उठावले भार वैष्णवांचे ॥२॥ सर्व स्वस्थ तेथेंज बैसले मिळून । नारदा कीर्तन पुढें होत ॥३॥ धन्य पुण्यस्तंभ धन्य गंगातीर । धन्य दिसती भार पाताकांचे ॥४॥ नामा म्हणे देवा निजभक्तीसाठींज । अंगें होसी कष्टी पांडुरंगा ॥५॥