भजनी मालिका

भजने

उतरिलीं विमानें स्वर्गीचें राऊळ । पताका रानोमाळ मिरविताती ॥१॥ सोपान मुक्ताई सद्‌‍गुरु निवृत्ति । रुक्माईचा पति मध्यभागीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उत्कंठित तप एक विठ्ठल नाम । आतां क्रियाकर्म कोणालागीं ॥१॥ राहेंरे तूं मना राहेंरे निवांत । ध्यायीं अखंडित नारा-यण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उत्तम अधम जया जे संगती । तैसी त्याचि मति फांकों लागें ॥१॥ सज्जना संगतीं धर्मक्रिया वाढे । पापीया आवडे पापबुध्दि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उत्तम अधम येथें नाहीं काम । जपें तूं श्रीराम सर्वकाळ ॥१॥ मंत्रतप कांहीं योगाची धारणा । न लगे नामस्मरणा वांचुनियां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उत्तम घालावें आमुचिये मुखीं । निवारावें दुःखी होऊ नेदी ॥१॥ न बैसे न वजे जवळूनि दुरी । मागें पुढें वारी घातपात ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उत्तम तें क्षेत्र उत्तम तें स्थळ । धन्य ते राऊळ पाहतां डोळां ॥१॥ एक एक तीर्थ घडती कॊटी वेळां । चंद्रभागा डोळां देखिलिया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उत्तम पुरुषाचें उत्तम लक्षण । जेथें भेद शून्य मावळला ॥१॥ भेदशुन्य जाला बोध स्थिरावला । विवेक प्रगटला ज्ञानोदय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उत्तम मध्यम कनिष्ठ यांचें नाहीं काम । जपावें तें नाम आधीं आधीं ॥१॥ वर्णाश्रम धर्म याचें नाहीं काम । जपावें तें नाम आधीं आधीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उत्तम संचित होतें गांठीं । तेणेंचि या भेटी संतांसवें ॥१॥ सुकृतासी आलीं फळें । भावबळें लगटोनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उत्तम साधन रामनाम जाण । यापरतें निधान आणिक नाहीं ॥१॥ नलगे समाधि रामनाम घेतां । उघडा जप तत्त्वतां सूपा राम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उत्तम स्त्री देखोनि दृष्टी । मुर्ख कैसा लाळ घोटी ॥१॥ तैसा विनटें रामनामा । तेणें चुकशी कर्माकर्मा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ