भजनी मालिका
← भजनांकडे परत

उतावेळपणें उभा । त्रैलोक्य शोभा पंढरीया

utavelapanen ubha | trailokya shobha pandhariya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उतावेळपणें उभा । त्रैलोक्य शोभा पंढरीया ॥१॥ मना छंद घेई वाचें । विठ्ठल साचे पाहुं डोळां ॥२॥ गळां तुळशीच्या माळा । केशर टिळा लल्लाटी ॥३॥ चंदनाचे शोभे उटी । वैजयंती कंठी मिरवत ॥४॥ दाष्टी धाय पाहतां रुप ।एका जनार्दनीं स्वरुप ॥५॥