भजनी मालिका
← भजनांकडे परत

उतरिलीं विमानें स्वर्गीचें राऊळ । पताका रानोमाळ मिरविताती

utarilin vimanen svargichen raul | pataka ranomal miravitati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उतरिलीं विमानें स्वर्गीचें राऊळ । पताका रानोमाळ मिरविताती ॥१॥ सोपान मुक्ताई सद्‌‍गुरु निवृत्ति । रुक्माईचा पति मध्यभागीं ॥२॥ टाळ मृदंग वाजताती विणे । नारद गायन करीतसे ॥३॥ नामा पुंडलिख चालती आवडीनें । संत साधूजन मिरवती ॥४॥ लहान थोर संत चालती मिळोन । करिती बोळवण नामा म्हणे ॥५॥