भजनी मालिका
← भजनांकडे परत

उत्तम तें क्षेत्र उत्तम तें स्थळ । धन्य ते राऊळ पाहतां डोळां

uttam ten kshetra uttam ten sthal | dhanya te raul pahatan dolan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उत्तम तें क्षेत्र उत्तम तें स्थळ । धन्य ते राऊळ पाहतां डोळां ॥१॥ एक एक तीर्थ घडती कॊटी वेळां । चंद्रभागा डोळां देखिलिया ॥२॥ गंगा प्रदक्षिणा समुद्राचे स्नान । परी हें महिमान नाहीं कोठें ॥३॥ वैष्णवांचा मेळ करिती गदारोळ । दिंडी पताका घोळ नोहे कोठें ॥४॥ एका जनार्दानी सारांचे हें सार । पंढरी मोहरे भाविकांसी ॥५॥