भजनी मालिका

भजने

आह्मीं गावें तुह्मीं कोणीं कांहीं न म्हणावें । ऐसें तंव आम्हां सांगितलें नाहीं देवें ॥१॥ म्हणा रामराम टाळी वाजवा हातें। नाचा डोला प्रेमें आपुलिया स्वहितें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आह्मीं जाणावें तें काई तुझें वर्म कोणे ठायीं । अंतपार नाहीं ऐसें श्रुति बोलती ॥१॥ होई मज तैसा मज तैसा साना सकुमार हृषीकेशा । पुरवीं माझी आशा भुजा चारी दाखवीं॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आह्मीं नामाचें धारक नेणों प्रकार आणीक । सर्व भावें एक विठ्ठल चि प्रमाण ॥१॥ न लगे जाणावें नेणावें गावें आनंदें नाचावें । प्रेमसुख घ्यावें वैष्णवांचे संगती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आह्मीं पतितांनीं घालावें सांकडें । तुम्हां लागे कोडें उगवणें ॥१॥ आचरतां दोष न धरूं सांभाळ । निवाड उकल तुम्हां हातीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

इकडुनी तिकडे चालू जैसें माप । तैशी जन्ममरण खेप प्राणियांसी ॥१॥ भोगितां नूतन सांडिती ते जाण । तैसें जन्ममरण प्राणियांसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

इकडे रुक्माईसी सांगे करुणाकर । चला पैं सत्वर पंढरीये ॥१॥ गरुडासहित वेगें पैं निघाले । पूर्ववत आले पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

इच्छामात्रें मोडी ब्रह्मांडाच्या कोटी । चालिला जग-जेठी कंसद्वारा ॥१॥ मदोन्मत्त हस्ती देखोनियां हांसे । पीतांबर कांसे खोवियेला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

इच्छिताती देव पंढरीचा वास । न मिळे सौरस तयां कांहीं ॥१॥ ऐसें श्रेष्ठ क्षेत्र उत्तमा उत्तम । याहुनी सुगम आहे कोठें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

इच्छिती तयांसी व्हावें जी अरूप । आम्हांसी स्वरूपिस्थती चाड ॥१॥ आतां नव्हे माझा भाव अनारिसा । पाउलांनी इच्छा गोवियेली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

इच्छेपाशीं आलों फिरोनि मागुता । स्वामीसेवकता आवडीचे ॥१॥ द्यावें लवकरी मागितलें दान । मुळींचें जतन करूनि असें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम