भजनी मालिका
← भजनांकडे परत

इच्छिताती देव पंढरीचा वास । न मिळे सौरस तयां कांहीं

ichchhitati dev pandharicha vas | na mile sauras tayan kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
इच्छिताती देव पंढरीचा वास । न मिळे सौरस तयां कांहीं ॥१॥ ऐसें श्रेष्ठ क्षेत्र उत्तमा उत्तम । याहुनी सुगम आहे कोठें ॥२॥ जनार्दनाचा एक म्हणतसे भावें । तीर्थ ते वंदावें पंढरी सदा ॥३॥