भजनी मालिका
← भजनांकडे परत

आह्मीं जाणावें तें काई तुझें वर्म कोणे ठायीं । अंतपार नाहीं ऐसें श्रुति बोलती

ahmin janaven ten kai tujhen varma kone thayin | antapar nahin aisen shruti bolati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आह्मीं जाणावें तें काई तुझें वर्म कोणे ठायीं । अंतपार नाहीं ऐसें श्रुति बोलती ॥१॥ होई मज तैसा मज तैसा साना सकुमार हृषीकेशा । पुरवीं माझी आशा भुजा चारी दाखवीं॥ध्रु.॥ खालता सप्त ही पाताळा वरता स्वर्गाहूनि ढिसाळा । तो मी मस्यक डोळां कैसा पाहों आपला ॥२॥ मज असे हा भरवसा पढीयें वोसी तयां तैसा । पंढरीनिवासा तुका म्हणे गा विठोबा ॥३॥