भजनी मालिका
← भजनांकडे परत

आहेसी ठाउक मागां संतजनां

ahesi thauk magan santajanan

आहेसी ठाउक मागां संतजनां । रिणाईत जाणा बहुतांचा ॥१॥ घेणें ज्याचें त्यास देणें नाहीं हरि । ऐसी हे परि जाणतसी ॥२॥ साजतसे तुम्हां थोर थोरपण । आमुचें कारण आम्हीं जाणों ॥३॥ कर्ममेळा म्हणे पंढरिनिवासा । आपुला तो ठासा सांभाळावा ॥४॥