भजनी मालिका
← भजनांकडे परत

इकडुनी तिकडे चालू जैसें माप । तैशी जन्ममरण खेप प्राणियांसी

ikaduni tikade chalu jaisen map | taishi janmamaran khep praniyansi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
इकडुनी तिकडे चालू जैसें माप । तैशी जन्ममरण खेप प्राणियांसी ॥१॥ भोगितां नूतन सांडिती ते जाण । तैसें जन्ममरण प्राणियांसी ॥२॥ पुष्पाचा परिमळ घेऊनी सांडिती जाण । तिसें जन्ममरण प्राणियांसी ॥३॥ देह धरूनी आला न करा स्वहित । करी अपघात आपणासी ॥४॥ एका जनार्दनीं दोषी तोचि जाणा । न भजे चरणा संताचिया ॥५॥