भजनी मालिका

भजने

आम्ही जाणों तुझा भाव । कैचा भक्त कैचा देव । बीजा नाहीं ठाव । कैचे फळ शेवटीं ॥१॥ संपादिले बहु रूप । कैचे पुण्य कैचे पाप । नव्हतों आम्ही आप । आपणासी देखिले ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही जातों तुम्ही कृपा असों द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥१॥ वाडवेळ झाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलावितो ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही तुझे असों एकचि त्या बोधें । नित्य परमानंदें वोसंडित ॥१॥ विठ्ठलचि घ्यावा विठ्ठचि गावा । विठ्ठचि पहावा सर्वाभूतीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आम्ही तों आपुलें निवेदिलें पायीं । अंतरीचे नाहीं वंचियेलें ॥१॥ तुम्ही सर्वजाणा जाणतां अंतर । काय परिहार वाउगाची ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आम्ही तों जिवें वेंच केला । तुमच्या बोलावरी देवा तंव तें तुम्हासी ठावे ॥ १॥ किती वेळ दावावें बोलोनि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आम्हीं तो वासना भाजियेली बळें । वैराग्याचोनि बळेंक आथियलें ॥१॥ सांडिला वेव्हार माया लोकाचार । भरला निर्धार हृदयामाजी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ