भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही तुझे असों एकचि त्या बोधें । नित्य परमानंदें वोसंडित

amhi tujhe ason ekachi tya bodhen | nitya paramananden vosandit

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आम्ही तुझे असों एकचि त्या बोधें । नित्य परमानंदें वोसंडित ॥१॥ विठ्ठलचि घ्यावा विठ्ठचि गावा । विठ्ठचि पहावा सर्वाभूतीं ॥२॥ या परतें सुख न दिसे सर्वथा । कल्पकोटि येतां गर्भवास ॥३॥ नामा म्हणे चित्तीं विठठलांचें रूप । संकल्प विकल्प मावळले ॥४॥