भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही तुझ्या दासीं । जरि जावें पतनासी

amhi tujhya dasin | jari javen patanasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही तुझ्या दासीं । जरि जावें पतनासी ॥१॥ तरि हें दिसे विपरीत । कोठें बोलिली हे नीत ॥ध्रु.॥ तुझें नाम कंठीं । आम्हां संसार आटी ॥२॥ तुका म्हणे काळ । करी आम्हांसी विटाळ॥३॥