भजनी मालिका

भजने

आणीकाचें नामें कोण हो तरला । ऐसें सांगा मला निवोडोनी ॥१॥ या रामनामें पातकी पतीत । जीव असंख्यात उद्धरीले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आणुनी धोंडोबा कोंडियेला घरीं । मात सांगे हरिजवळी नामा ॥१॥ दामशेटी गेला आपुले कारणा । मागें आणिलें जाणा धोंडोबासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आणूनि सुरभि करी अभिषेक । येती सकळिक मरुद्नण ॥१॥ सुरवरांची दाटी करिती नमस्कार । होतसे अपार पुष्पवृष्टी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आणूनियां मना । आवघ्या धांडोळिल्या खुणा । देखिला तो राणा । पंढरपूरनिवासी ॥१॥ यासी अनुसरल्या काय । घडे ऐसें वांयां जाय । देखिले ते पाय । सम जीवीं राहाती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आणूनियां सिंहासनीं बैसविला । पूजा उपचार केला षोडशोपचार ॥१॥ वस्त्र अलंकार देउनी गौरविला । मग पुसता जाहला क्षेम सर्व ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आतसिकुसुमकोशशामघनु । तुळशीवृंदावनामाजी मुनीमनोपद्मदळविशाळजिरे आयो ॥ध्रु०॥ जलधीशयन कमलालयाजीवनु । बापरखुमादेविवरु विठ्ठलु घनानंदुमुर्ति ॥१॥

आतां असों मना अभक्तांची कथा । न होई दुश्चिता हरीनामीं ॥१॥ नये त्याची कदा गोष्टी करूं मात । जिव्हे प्रायिश्चत्त त्याच्या नांवें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां आम्हां हें चि काम । वाचे गाऊ तुझें नाम । वाहुनियां टाळी प्रेम । सुखें आनंदे नाचावें ॥१॥ अवघी जाली आराणूक । मागें पुढें सकिळक । त्रिपुटीचें दुःख । प्रारब्ध सारिलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां आम्हीं सहजचि थोर । ब्रह्मा विष्णु महेश्वर । परब्रह्मा स्वयें ॐकार । परात्पर जगदात्मा ॥१॥ आम्हीं सहजचि स्वतः सिद्ध । जागृति सुषुप्ति साध्य । तूर्या त्रिसाक्षीणी बोध । अति अगाध उन्मनी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आतां आवश्यक करणें समाधान । पाहिलें निर्वाण न पाहिजे ॥१॥ केलें तरीं आतां सुशोभ्य करावें । दिसतें बरवें संतांमधीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां आहे नाहीं पाहतां क्षण एक । संपत्तीचे सुख विषय हा ॥१॥ हित तें आचरा हित तें विचारा । नामीं भाव धरा जाणतेनो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न कळे । तरी मातेचिये खोळे । दगड आला पोटासी ॥१॥ मनुष्यदेहा ऐसा निध । साधिली ते साधे सिद्ध । करूनि प्रबोध । संत पार उतरले ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम