भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां आहे नाहीं । न कळे आळी करा कांहीं

atan ahe nahin | na kale ali kara kanhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां आहे नाहीं । न कळे आळी करा कांहीं ॥१॥ देसी पुरवुनी इच्छा । आतां पंढरीनिवासा ॥ध्रु.॥ नेणे भाग सीण । दुजें कोणी तुम्हांविण ॥२॥ आतां नव्हे दुरी । तुका पायीं मिठी मारी ॥३॥