भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां आम्हां हें चि काम । वाचे गाऊ तुझें नाम । वाहुनियां टाळी प्रेम । सुखें आनंदे नाचावें

atan amhan hen chi kam | vache gau tujhen nam | vahuniyan tali prem | sukhen anande nachaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां आम्हां हें चि काम । वाचे गाऊ तुझें नाम । वाहुनियां टाळी प्रेम । सुखें आनंदे नाचावें ॥१॥ अवघी जाली आराणूक । मागें पुढें सकिळक । त्रिपुटीचें दुःख । प्रारब्ध सारिलें ॥ध्रु.॥ गोदातटें निर्मळें । देव देवांचीं देवळें । संत महंत मेळें । दिवस जाय सुखाचा ॥२॥ तुका म्हणे पंढरीनाथा । आणिक नाहीं मज चिंता । योगक्षेम माथां । भार तुझ्या घातला ॥३॥