भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां असों मना अभक्तांची कथा । न होई दुश्चिता हरीनामीं

atan ason mana abhaktanchi katha | na hoi dushchita harinamin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां असों मना अभक्तांची कथा । न होई दुश्चिता हरीनामीं ॥१॥ नये त्याची कदा गोष्टी करूं मात । जिव्हे प्रायिश्चत्त त्याच्या नांवें ॥ध्रु.॥ प्रभातें न घ्यावें नांव माकडाचें । तैसें अभक्तीाचें सर्वकाळ ॥२॥ तुका म्हणे आतां आठवूं मंगळ । जेणें सर्व काळ सुखरूप ॥३॥