भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां आशीर्वाद । माझा असो सुखें नांद

atan ashirvad | majha aso sukhen nand

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां आशीर्वाद । माझा असो सुखें नांद ॥१॥ ह्मणसी कोणा तरी काळें । आहेतसी माझीं बाळें ॥ध्रु.॥ दुरी दूरांतर । तरी घेसी समाचार ॥२॥ नेसी कधीं तरी । तुका ह्मणे लाज हरी ॥३॥