भजनी मालिका

भजने

आजी नवल झालें वो माय । पाहण्या पाहण्या पाहणें दृष्टी धाये ॥१॥ ऐसा लाघवी सुखकर मूर्ती । संतसंगे जाली मज विश्रांती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आजी नीलवर्ण कुसुमसम । देखिला मेघ शाम विटेवरी ॥१॥ अतसीकुसुम रंग रंगला श्रीरंग । भोंवाता शोभे संग संतजन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आजी मी तयाचे न पाहतां चरण । देईन आपुला प्राण याचिक्षणीं ॥१॥ जाणोनी निर्धार सांवता बोले त्यासी । ह्रदयनिवासी आत्माराम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आजी वो कां हो कृष्ण नाहीं आला । म्हणोनि खेद करी गौळणी बाळा । काय हो ऐसा देहीं लागला चाळा । कां रे न येसी बाळा नंदाचिया ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

आजीचा सुदीनु आम्हां झाला आनंदु । सकळां स्वरुपीं स्वयें देखें गोविंदु ॥१॥ पाहिला गे माय आतां सांगुं मी कैसें । जेथें पाहे तेथेंक गोविंदु दिसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आज्ञा पाळुनियां असें एकसरें । तुमचीं उत्तरें संतांचीं हीं ॥१॥ भागवूनि देह ठेवियेला पायीं । चरणावरी डोई येथुनें चि॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आज्ञापिलें जें श्रीहरी । तेचि वदली हें वैखरी ॥१॥ नाहीं माझें येथ वीर्य । जाणे ज्याचें तोचि कार्य ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आझां संगती नावडे कांहीं । म्हणोनि झालों बा विदेही । दु:खमूळ संगतीचें । आम्ही नव्हों त्या गांवीचे ॥१॥ आम्हा नाहीं रूप नांव । वस्तीची नाहीं एक ठाब । मग ध्या इच्छेसि धांव । आम्ही नव्हों त्या गांबींचे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आठ दिवसांची ऐवजाची बोली । आहे ते नेमिली नामा सांगे ॥१॥ सांगोनियां नामा राउळासी आला । वृत्तांत सांगितला विठोबासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आठऊनियां श्रीकृष्णचरण । अक्ररें रायातें पुसोन । चालिला रथावरी बैसोन । मार्गी हरिगुण आठवितु ॥१॥ गोकुळा पाठविला अक्रूर । परि कंसामनी दचक थोर । तेणें पाचारुनियां धनुर्धर । चौकिये बाहेर बसविले ॥२॥

रचनाकार: संत निळोबा