भजनी मालिका
← भजनांकडे परत

आझां संगती नावडे कांहीं । म्हणोनि झालों बा विदेही । दु:खमूळ संगतीचें । आम्ही नव्हों त्या गांवीचे

ajhan sangati navade kanhin | mhanoni jhalon ba videhi | du:khamul sangatichen | amhi navhon tya ganviche

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आझां संगती नावडे कांहीं । म्हणोनि झालों बा विदेही । दु:खमूळ संगतीचें । आम्ही नव्हों त्या गांवीचे ॥१॥ आम्हा नाहीं रूप नांव । वस्तीची नाहीं एक ठाब । मग ध्या इच्छेसि धांव । आम्ही नव्हों त्या गांबींचे ॥२॥ स्नान केलें गंगा-तीरीं । गंध लविलें पंढरपुरीं । संध्या केली कृष्णातिरीं । आम्ही त्या नव्हों त्या गांबींचे ॥३॥ भिक्षा केली कोल्हापुरीं । भोजन केलें महाद्वारीं । निद्रा केली माहुरीं । आम्ही त्या नव्हों त्या गांबींचे ॥४॥ ऐसियाची संगत करीं । त्याचे चरण ह्लदयीं धरीं । नामा ह्मणे या संसारीं । आम्ही त्या नव्हों त्या गांबींचे ॥५॥