भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजी नीलवर्ण कुसुमसम । देखिला मेघ शाम विटेवरी

aji nilavarna kusumasam | dekhila megh sham vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आजी नीलवर्ण कुसुमसम । देखिला मेघ शाम विटेवरी ॥१॥ अतसीकुसुम रंग रंगला श्रीरंग । भोंवाता शोभे संग संतजन ॥२॥ निळीय भासत तो रंग दिसत । शामंकित शोभत विठ्ठल देव ॥३॥ एका जनार्दनीं नीलवर्ण रुपडें । पाहतां चहुकडे कोंदाटलें ॥४॥