भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजी दिवाळी दसरा । श्रीसाधुसंत आले घरा

aji divali dasara | shrisadhusant ale ghara

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आजी दिवाळी दसरा । श्रीसाधुसंत आले घरा ॥१॥ पायीं घालूं मिठी । आनंदें नाचुं वाळुवंटीं ॥२॥ पाहूं हरींचें ध्यान । तेणें मना समाधान ॥३॥ एका जनार्दनीं भाव । विटे उभा विठ्ठलराव ॥४॥