भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजी मी तयाचे न पाहतां चरण । देईन आपुला प्राण याचिक्षणीं

aji mi tayache na pahatan charan | dein apula pran yachikshanin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आजी मी तयाचे न पाहतां चरण । देईन आपुला प्राण याचिक्षणीं ॥१॥ जाणोनी निर्धार सांवता बोले त्यासी । ह्रदयनिवासी आत्माराम ॥२॥ अभिमानें नाडले प्रपंचीं भागलें । ते या श्रीविठ्ठलें उध्दरिले ॥३॥ नामदेव तुज तंव नाहीं अभिमान । मग कळली खूण अंतरांत ॥४॥ एका जनार्दनीं सदगद होउनी । मिठी घाली चरणीं सांवत्याच्या ॥५॥