भजनी मालिका

भजने

निगमाचे शाखे आगमाचें फळ । वेद शास्त्रा बोल विठ्ठल हा ॥१॥ पुराणासी वाड योगियांचें गुज । सकळां निजबीज विठ्ठल हा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

निगुर्णाची प्राप्ति सगुणाचें योगें । वरि भक्ति अंगीं दृढ भाव ॥१॥ नलगे ध्यान प्रौढी योगयाग तपें । ज्ञानचियें बापें हातां नये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निघतां उत्तम शकुन ते जाहले । तेणें संतोषलें चित्त त्याचे ॥१॥ तांतडीनें द्वारके येऊनि पावला । सभामंडप देखिला दृष्टी भरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निघोनियां दखो आली त्या तटाका । झाली एकमेकां मेटी तेथें ॥१॥ परस्परें दु:ख देखतां वाढलें । धैर्याचेंचि बळ केलें त्यांनीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निज गुज रुक्माई पुसे पंढरीनाथा । ठेवुनियां माथा चरणावरी ॥१॥ सर्वांहुनि पढियंते काय स्वामितातें । तें मज निरुतें सांगा स्वामी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निज पैसा समरसें । गोकुळा आली द्वेषे । कृष्णामुखीं विषें । निर्विष जाली ॥१॥ सोडीं सोडीं बा कान्हा । आक्रंदे पुतना । मागुती जनार्दना । मी न ये येथें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निज ब्रह्मा ब्रह्म तो । ब्रह्मादिकां वंद्य तो गे बाई ॥१॥ अचिंतचिंतन तो । सारासार गुह्य तो गे बाई ॥ध्रु०॥

निज सायासें जोडुनी । होतें निक्षेपुनी ठेविलें ॥१॥ तेंचि दिधलें माझया हातीं । आजीं संतीं कृपादान ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

निजध्यास लागला मनीं । हाचि चिंतनीं दिवसरात्रीं ॥१॥ न सुटेचि करुं कैसें । लाविलें पिसें गोवळें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

निजात्मप्राप्तीलागीं सार । हरीचिया उच्चार नामाचा ॥१॥ हेंचि बीज हेंचि गुज । हेंचि निज निजाचें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा