भजनी मालिका
← भजनांकडे परत

निज लक्षाचें लक्ष हरपलें भान

nij lakshachen laksha harapalen bhan

निज लक्षाचें लक्ष हरपलें भान । दिन मान शून्य जया माजी ॥ १ ॥ तें ब्रह्म गोजिरें गोपाळ संगती । संवगडे सांगाती भाग्यवंत ॥ २ ॥ वेणुवाद्यध्वनि यमुनाजळ स्थिर । ध्यानाचा प्रकार कृष्णरासी ॥ ३ ॥ निवृत्ति म्हणे तें स्वरूप सौख्य रूपडें । पाहाती चहूंकडे योगीजन ॥ ४ ॥