भजनी मालिका
← भजनांकडे परत

निगुर्णाची प्राप्ति सगुणाचें योगें । वरि भक्ति अंगीं दृढ भाव

nigurnachi prapti sagunachen yogen | vari bhakti angin drudh bhav

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निगुर्णाची प्राप्ति सगुणाचें योगें । वरि भक्ति अंगीं दृढ भाव ॥१॥ नलगे ध्यान प्रौढी योगयाग तपें । ज्ञानचियें बापें हातां नये ॥२॥ पाहिजे समता सर्वाभूती भाव । मुंगी आणि राव सारखेची ॥३॥ एका जनार्दनीं हेंचि हातवटीं । देवा तुझी भेटी तरीच होय ॥४॥