भजनी मालिका

भजने

चिंतनें अचिंत राहिलों निश्चळ । तें चि किती काळ वाढवावें ॥१॥ अबोल्याचा काळ आतां ऐशावरी । वचनाची उरी उरली नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चिंतनें उद्धरला पापी । महा दोषी केला निःपापी । तया म्हणती ऋषी तपी । पुराणीं तें सर्व ॥१॥ नारदें सांडोनिया मंत्र । केला जगी तो पवित्र । चिंतना एवढें पात्र । आन नाही सर्वथा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिंतने कंसासुर तरला । चिंतनें पूतनेचा उद्धार केला । चिंतने आनंद जाहला । अर्जुनादिकांसी ॥१॥ म्हणोनी करावें चिंतन । काया वाचा आणि मन । संतांचे चरण । नित्य काळ चिंतावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिंतनें गणिका निजपदा । चिंतने अजामेळ तोहि सदा । बैसविला आपुले पदा । चिंतनेची सर्वथा ॥१॥ चिंतनें उद्धरी सर्वथा । न म्हणे यातिकुळ कुपात्रा । चिंतनें तारी सर्वत्रा । प्राणिमात्रा जगासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिंतनें धांवे भक्तांपाठीं । धरीं कांबळीं हातीं काठी । चिंतनें उठाउठी । बांधवितो आपणिया ॥१॥ ऐसा भुकेला चिंतनाचा । न पाहे यातीहीन उंचाचा । काय अधिकार शबरीचा । फळें काय प्रिय तीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिंतनें पर्वकाळ रासी । येती अपैशा घरासी । चिंतन तें सार सर्वांसी । व्रतां तपांसी चिंतन ॥१॥ चिंतनें यज्ञ दान धर्म । चिंतनें घडे नाना नेम । आणिक तें वर्म । चिंतने घडे सर्वथा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिंतनें बळिद्वारें बंधन । चिंतनें ह्य समाधान । न म्हणे उच्छिष्ट अथवा पुर्ण । चिंतनेंची मुख पसरी ॥१॥ चिंतनें भोळे भाविक जन । तयाचें वारी नाना विघ्न । धर्माघरीं उच्छिष्ट जाण । चिंतनसाठी काढितसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिंतनें बिभीषण मुक्त । चिंतनें जाहला जनक जीवमुक्त । चिंतनें कुळ सरित । सर्वेभावें हरि होय ॥१॥ आवडी चिंतावे चरण । दुजेंनको मानधन । नाम स्मरणावांचुन । चिंतनचि नसो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिंतनें सरे तो धन्य धन्य काळ । सकळ मंगळ मंगळांचें ॥१॥ संसारसिंधु नाहीं हरीदासा । गर्भवास कैसा नेणती ते ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चिंतनेंक नासतसे चिंता । चिंतनें सर्व कार्य ये हातां । चिंतनें मोक्ष सायुज्यता । घर शोधितसे ॥१॥ ऐसे चिंतनाचें महिमान । तारिले अधम खळ जन । चिंतने समाधान । प्राणिमात्रा होतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी । प्रवेश भीतरी केला देवें ॥१॥ देव आला घरा नंदाचिया गांवा । धन्य त्याच्या दैवा दैव आलें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

चिंता नाहीं गांवीं विष्णुदासांचिये । घोष जयजयकार सदा ॥१॥ नारायण घरीं सांठविलें धन । अवघे चि वाण तया पोटीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चिंतातुर देहीं न साहे काजळी । नामाची पाजळी उभय दिवीं ॥१॥ प्रकाश पडेल ब्रह्म हें दिसेल । वैकुंठ जोखेल भजनभक्तीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चिंतातुर मन नसावें कदाकाळीं । हृदयीं नामावळी जप करी ॥१॥ श्रीअनंता माधवा गोविंदा । हाचि जप सदा चिंत्तामाजीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिंतामणिदेवा गणपतीसी आणा । करवावें भोजना दुजे पात्रीं ॥१॥ देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी । अभिमानाभीतरी नागवलों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चिंतिलें तें मनिंचे जाणें । पुरवी खुणे अंतरींचें ॥१॥ रात्री न कळे दिवस न कळे । अंगीं खेळे दैवत हें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम