भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिंतिलें अपैसें पाविजे सायासें

chintilen apaisen pavije sayasen

चिंतिलें अपैसें पाविजे सायासें । तरी कामा नसे सायास या ॥१॥ देखणें स्वप्नींचे भुररें मायेचें । भ्रमित देहाचे हरिविण ॥२॥ आयुष्याची पेंठ संसाराचे तट । गुरुविण वाट कैची रया ॥३॥ त्रिपुटिसी वर्ते वैकुंठ सरतें । प्रेमेंविण भरितें कैसें येत ॥४॥ ज्ञानदेवि घर केलें पै सपुर । संसार येरझार हरिचरणीं ॥५॥