भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिंतातुर मन नसावें कदाकाळीं । हृदयीं नामावळी जप करी

chintatur man nasaven kadakalin | hrudayin namavali jap kari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चिंतातुर मन नसावें कदाकाळीं । हृदयीं नामावळी जप करी ॥१॥ श्रीअनंता माधवा गोविंदा । हाचि जप सदा चिंत्तामाजीं ॥२॥ वारंवार चिंतावीं देवाचीं पाउलें । जेणें जन्मजाळें उकलेल ॥३॥ एका जनार्दनीं आलासे प्रत्यय । सर्वभावें गाय नाम त्याचें ॥४॥