भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिंतनें अचिंत राहिलों निश्चळ । तें चि किती काळ वाढवावें

chintanen achint rahilon nishchal | ten chi kiti kal vadhavaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चिंतनें अचिंत राहिलों निश्चळ । तें चि किती काळ वाढवावें ॥१॥ अबोल्याचा काळ आतां ऐशावरी । वचनाची उरी उरली नाहीं ॥ध्रु.॥ करूं आला तों तों केला लवलाहो । उरों च संदेहो दिला नाहीं ॥२॥ तुका म्हणे मोह परते चि ना मागें । म्हणउनि त्यागें त्याग जाला ॥३॥