भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिंतितां साधक मनासि ना कळे

chintitan sadhak manasi na kale

चिंतितां साधक मनासि ना कळे । तो गोपिकासी आकळे करितां ध्यान ॥ १ ॥ देखिलागे माये सगुणागुणनिधि । यशोदा गोविंदीं प्रेम पान्हा ॥ २ ॥ न माये सर्वाघटी आपणचि सृष्टी । तो यमुनेच्या तटीं गायी चारी ॥ ३ ॥ निवृत्ति साधन कृष्णाचे रूपडें । ब्रह्मांडा एवढें तदाकार ॥ ४ ॥