भजनी मालिका

भजने

गोविंयेंलें देवें आम्हांसी अभिमानें । नामरुप पेणें अंतरलों ॥१॥ करिती विचार इंद्रादी देव । हें सुखवैभव न मिळे आम्हां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोसावीपणाचा दाखविती वेष । नाहीं निदिध्यास हरिनामीं ॥१॥ वरी वरी आर्त दाविती झगमग । अंतरीं तो संग विषयाचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गौ आणि कन्या कथेचा विकरा । चांडाळ निर्धार पापराशी ॥१॥ तयाचें तें मुख न पाहती जन । अपवित्र दुर्जन पातकी तो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गौळणी आल्या वाज । म्हणती या गे राखों आज । सांपडवुनी माजघरांत धरुनी कोंडूंनी । उघडें कवाड उभ्या काळोशाचे आड । साता पांचा एक भीड मौनेंची ठेल्या ॥१॥ नित्य सोंकवला नेदी । सांगों चित्त बोला । आतां सांपडतां याला कोण सोडी जीवें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गौळणी गार्‍हाणे सांगतो यशोदेसी । दहीं दुध खाऊनियां पळुनी जातो हृषीकेशी ॥१॥ लाडका हा कान्हा बाई तुझा तुला गोड वाटे । याच्या खोडी किती सांगु महीपत्र सिंधु आटे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गौळणी बांधिती धारणासि गळा । खेळे त्या गोपाळांमाजी ब्रम्ह ॥१॥ धांवोनियां मागे यशोदे भोजन । हिंडे रानोरान गाईपाठीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गौळणी बारा सोळा । हो उनी येके ठायीं मेळा । म्हणती गे कृष्णांला । धरुं आजीं ॥१॥ कवाड लाउनीं । बैसल्या सकळजणी । रात्र होतांचि माध्यांनी । आला कृष्ण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गौळणी म्हणती यशोदेला । कोठें गे सांवळां । कां रथ शृंगारिला । सांगे वो मजला । अक्रुर उभा असे बाई गे साजरी ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

गौळणीचा थाट निघाला मथुरे हातालागीं । तें देखोनि जगदीश धांवला गोप घेऊनी वेगीं ॥१॥ कान्हयां सरसर परता नको आरुता येऊं । तुझा संग झालिया मग मी घरा कैसी जाऊं ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

गौळियांचीं पोरें वांकुल्या दाविती । क्रोधावला चित्तीं ब्रह्मदेव ॥१॥ चोरोनियां नेत गोवत्स गोपाळ । पाहूं याचें बळ किती आहे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गौळियाचे घरीं कैवल्याचे दानी । परब्रह्म अंगणीं कीडतसे ॥१॥ ऐसें कांहीं करा आलेनो संसारा । जेणें जोडे सोईरा पांडुरंग ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गौळियाचे घरीं रहिवास गोकुळीं । तेथें तुह्मी सकळीं वास कीजे ॥१॥ वसुदेव देवकी उदरीं जन्मेन । क्मसभयें राहीन गोकुळीं हो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ग्रंथाचे अर्थ नेणती हे खळ । बहु अनर्गळ जाले विषयीं ॥१॥ नाहीं भेद म्हणून भलतें चि आचरे । मोकळा विचरे मनासवें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम