भजनी मालिका
← भजनांकडे परत

गौळियांचीं पोरें वांकुल्या दाविती । क्रोधावला चित्तीं ब्रह्मदेव

gauliyanchin poren vankulya daviti | krodhavala chittin brahmadev

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गौळियांचीं पोरें वांकुल्या दाविती । क्रोधावला चित्तीं ब्रह्मदेव ॥१॥ चोरोनियां नेत गोवत्स गोपाळ । पाहूं याचें बळ किती आहे ॥२॥ जाणोनी चित्ती देव हांसतसे । सामर्थ्य पाहातसे पुत्र माझा ॥३॥ ते-थून आणवीं नव्हे हें उचीत । ह्मणोल किंचित पराक्रम ॥४॥ नामा ह्मणे ऐसें विचारिलें चित्तीं । करीतसे श्रीपति काय तेव्हां ॥५॥