भजनी मालिका

भजने

एकाचिया द्वारी भीकचि मागणें उभेचि राहाणे एका द्वारी ॥१॥ एकाचिया घरी उच्छिष्ट काढणें । लोणी जें चोरणें एका घरीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एकाचिये सोई कवित्वाचे बांधे । बांधिलिया साधे काय तेथें ॥१॥ काय हातीं लागे भुसाचे कांडणीं । सत्यासी दाटणी करुनि काय ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

एकाची काजें फीटलें सांकडें । उगाविलें कोंडे बहुतांची ॥१॥ तोचि हरी उभा चंद्रभागें तटीं । कर ठेउनी कटीं अवलोकित ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एकाची स्तुती एकाची निंदा । करितां अंगीं आदळे बाधा ॥१॥ अर्धांगीं लक्ष्मी वंदावी । चरणीं गंगा ती काय निंदावी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एकाचे अंगणीं राहिला परिवारें । उदर तो न भरे दु:ख करी ॥१॥ कांता पुत्र स्वयें क्षुधेनें मरती । होतसे फ़जिती प्रपंचाची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एकाच्या कैवारें । कली मारिले सर्व धुरे । तयांसे ते बरे । आपणापाशीं ठेवी ॥१॥ ऐसा कृपावंत स्नेहाळ । भरलें कीर्ति भूमंडळ तया स्मरे हळाहळ । निशीदिनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एकांत एकला सर्व आहे हरी । ऐसेंचि अहर्निशीं ध्यायिजे तूं ॥१॥ सर्वांभूतीं विठठल आहे आहे साचे । हें तंव वेदींचे वचन जाण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एकांतांचे सुख देई मज देवा । आघात या जीवा चुकवूनि ॥१॥ ध्यानीं रूप वाचे नाम निरंतर । आपुला विसर पडों नेदीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

एकांति बाळा । कीं सोहंसुखशयन वेळा । पाहे चरणकमळा । सुंदराचे ॥ तेथें अरुण उदेला । कीं सुमन प्रगटला । कमळणी जाला । अंतरीं विकासु ॥

एकांती बैसणें शरीर रोधणें । अष्टांग साधनें श्रम नको ॥१॥ गुदातें अंगुष्ठ लावुनी बैसणें । शरीरीं रोधणें पंचप्राण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एकांतीं लोकांतीं करूं गदारोळ । लेश तो ही मळ नाहीं येथें ॥१॥ घ्यावें द्यावें आह्मीं आपुलिया सत्ता । न देखों पुसता दुजा कोणी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

एकादशी दिनीं खाईल जो अन्न । सूकर होऊनि येईल जन्मा ॥१॥ एकादशी दिनीं करील जो भोग । त्यासी माता संग घडतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव