भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकाचिया द्वारी भीकचि मागणें उभेचि राहाणे एका द्वारी

ekachiya dvari bhikachi maganen ubhechi rahane eka dvari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एकाचिया द्वारी भीकचि मागणें उभेचि राहाणे एका द्वारी ॥१॥ एकाचिया घरी उच्छिष्ट काढणें । लोणी जें चोरणें एका घरीं ॥२॥ एकाचिये घरीं न खाये पक्कान्न । खाय भाजी पान एका घरीं ॥३॥ एकाचिये घरीं व्यापुनी राहाणें । एकासी तो देणें भुक्तीमुक्ती ॥४॥ एका जनार्दनी सर्वाठायीं असे । तो पंढरीये वसे विटेवरी ॥५॥