भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकाचिये वेठी । सांपडलों फुकासाठी

ekachiye vethi | sampadalon phukasathi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एकाचिये वेठी । सांपडलों फुकासाठी ॥१॥ घेतों काम सत्ताबळें । माझें करूनि भेंडोळें ॥ध्रु.॥ धांवे मागें मागें । जाय तिकडे चालत लागे ॥२॥ तुका म्हणे नेलें । माझें सर्वस्वें विठ्ठलें ॥३॥