भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकादशी दिनी संतु तुका वाणी

ekadashi dini santu tuka vani

रचनाकार: संत संताजी · अभंग
एकादशी दिनी संतु तुका वाणी । राऊळा आंगणी उभे होते ।। १ ।। तेव्हा संतु तेली गेलासे दर्शना । पांडुरंग चरणा नमियेले ।।२।। तेथुनी तो आला तुका जेथे होता । अलिँगन देता झाला त्याशी ।।३।। तुका म्हणे संतु पुसतो तुजला । सांगतो तुजला संतु म्हणे ।।४।।