भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य कथाश्रवणीं प्रीती । चित्तवृत्ति अर्थातरीं

nitya kathashravanin priti | chittavrutti arthatarin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नित्य कथाश्रवणीं प्रीती । चित्तवृत्ति अर्थातरीं ॥१॥ तेचि आधिकारीं या सुखा । स्वानुभव निका पावती ॥२॥ जयां बोलतां चालतां । एकात्मता न खंडे । ॥३॥ निळा म्हणे आले घरां । सुख माहेरा विश्रांती ॥४॥