भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

नका बोलों शब्द वावगे विवाद । आठवा गोविंद ध्यानीं मनीं ॥१॥ सकळही तुमचें होईल कल्याण जरी गाल गाणें विठोबाचें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नका होऊं खेदक्षीण । घ्या भाष माझें बंधन । तुम्हां वांचूनियां मजही कोण । आहे तें आप्त इहलोकीं ॥१॥ जैसा तुमचा मजवरी भाव । माझीही तैसाची तुम्हांवरी जीव । नाही येथें संदेहा ॥ ठाव । चित्ताचित्त साक्ष असे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा । निवृत्ति उदारा सोपान देवा ॥१॥ नमो मुक्ताबाई त्रैलोक्य पावनी । आदित्रय जननी देवाचिया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा । नमो सद्गुरु सच्चिदानंदरुपा । नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती । नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती ॥१॥ तुझया आठवीं वीसरे आपणातें । तरंगा जळीं घालितां जेवि होते ॥ अळंकार सोनेंचि होऊनि ठेला । निळा यापरी आठवी सद्गुरुला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नयेचि साचा हा प्रतीति । असोनियां भूतीं भगवंत ॥१॥ कर्माकर्में लागलीं पाठीं । बैसले दृष्टी मळ त्यांचे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नरकासुरा वधिलें जेणें । मुरुसी मर्दुनी घेतलें ठाणें । वृत्रासुराचें हरिलें जिणें । तारकासुरा प्राणहानी केली ॥१॥ मधु दैत्याचें सूदन । हिरण्याक्षाचे घेतले प्राण । हिरण्यकश्यपा विदारुन । काळयवन दग्ध केला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नरसिंह मेहता गुजराथी ब्राम्हण । धरिला अभिमान त्याचा तुम्हीं ॥१॥ व्दारकेसी त्याच्या हुंडया भरियेल्या । शोभनासी नेल्या वस्त्रें पेटया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नवल हा प्रकाशवेगळा । झांकिलियाही डोळा पुढें दिसे ॥१॥ नव्हे हा उजळिला सवेंचि मावळला । आत्मतेजें केला उदो नित्य ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नवल हे कृपा घनवट । उडवूनी मायेचें फळकट । आप आपणां केलें प्रगट । मोडिली वाट दुसयाची ॥१॥ आपणांसवें आपण खेळे । आपआपणासी चावळे । शेखीं आपण आपणा मिेळे । खेळतां वेगळें दाउनि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नव्हते एक ना दुसरें कांहीं यासी । होता लपोनिया आपुलीये कुसीं । कांहिंचि नाळखुनि आपआपणासि । तोचि येउनि येथें जाला अविनशी वो ॥१॥ रुप धरिलें सगुण चांगलें । ठाणमाण माण जेथील तेथेंचि रेखीलें । चतुर्भुज शंखचक्रातें मिरवलें । मुगुट माळा श्रवणीं सुतेज कुंडले वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नव्हे हे सांगितली मात । महिमाचि अदभुत सद्गुरुचा ॥१॥ जीवा जीवपणा वंग । तोडूनि अभंगु ब्रम्ह करी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा