भजनी मालिका
← भजनांकडे परत

नष्टा सज्जना एकचि वाट । परि अनिष्ट इष्ट फळें

nashta sajjana ekachi vat | pari anishta ishta phalen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नष्टा सज्जना एकचि वाट । परि अनिष्ट इष्ट फळें ॥१॥ एका उत्तम वैकुंठवास । जाणें निरयास हें एका ॥२॥ जातां येतां सारिखेचि दिसती । परि ते पावती पद भिन्न ॥३॥ निळा म्हणे अर्जित फळ । भोगवी कपाळ ज्याचें त्या ॥४॥