पंढरपुरचा जाणा विठ्ठल धणी । राणी रुक्मिणी सत्यभामा
pandharapuracha jana viththal dhani | rani rukmini satyabhama
पंढरपुरचा जाणा विठ्ठल धणी । राणी रुक्मिणी सत्यभामा ॥ १ ॥ भूमीमध्यें गुप्त कानोपात्रा झाली । उजवे बाजू ठेली लक्ष्मी ते ॥ २ ॥
pandharapuracha jana viththal dhani | rani rukmini satyabhama
पंढरपुरचा जाणा विठ्ठल धणी । राणी रुक्मिणी सत्यभामा ॥ १ ॥ भूमीमध्यें गुप्त कानोपात्रा झाली । उजवे बाजू ठेली लक्ष्मी ते ॥ २ ॥
pandhari nagari daivat shrihari | jati varakari vratanemen
पंढरी नगरी दैवत श्रीहरी । जाती वारकरी व्रतनेमें ॥ १ ॥ आषाढी कार्तिकी महापर्वें थोर । भजनाचा गजर करिती तेथें ॥ २ ॥
pandhari nagarin nandato shrihari | gai valitya kari gopalapurin
पंढरी नगरीं नांदतो श्रीहरी । गाई वळित्या करी गोपाळपुरीं ॥ १ ॥ गोपाळ मिळाले गोपाळपुर झालें । अक्षयीं राहिले देव तेथें ॥ २ ॥
paha disato padartha | avagha nashivant vyartha
पहा दिसतो पदार्थ । अवघा नाशिवंत व्यर्थ ॥ १ ॥ माया बहुरूपी नटली । नवखंडी प्रगटली ॥ २ ॥
papanche parvat mothe jhale | sharir nasalen adhogati
पापांचे पर्वत मोठे झाले । शरीर नासलें अधोगती ॥ १ ॥ जन्मांतरीं केलें अवघें व्यर्थ गेलें । देह हो नासले क्षणामाजी ॥ २ ॥
prarabdhachi gati | kadakalin na soditi
प्रारब्धाची गति । कदाकाळीं न सोडिती ॥ १ ॥ होणार सोडिना । आलें कपाळी टळेना ॥ २ ॥
prem shanti daya sharan nirdharesi | basale udasi sarva kal
प्रेम शांति दया शरण निर्धारेसी । बसले उदासी सर्व काळ ॥ १ ॥ काया वाचा मन निवडूनी प्राण । गुह्य ज्ञान पूर्ण सर्व साक्षी ॥ २ ॥
bhasma uti rundamala | hatin trishul netrin jvala
भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥ गज चर्म व्याघ्रांबर । कंठीं शोभे वासुकी हार ॥ २ ॥
bhola ha shankar pudhen nandishvar | tethen mi pamar kay varnu
भोळा हा शंकर पुढें नंदीश्वर । तेथें मी पामर काय वर्णू ॥ १ ॥ भूषण जयाचें भुवना वेगळें । रुंडमाळा खेळे गळ्यामध्यें ॥ २ ॥
sharirachi hoy mati | koni na yeti sangati
शरीराची होय माती । कोणी न येती सांगाती ॥ १ ॥ सारी अवघीं कामें खोटी । अंतीं जाणें मसणवटी ॥ २ ॥
sakal dharmachen karan | namasmaran harikirtan
सकळ धर्माचें कारण । नामस्मरण हरिकीर्तन ॥ १ ॥ दया क्षमा समाधान । घ्यावे संतांचें दर्शन ॥ २ ॥
satya jyotiling bara | pratahkalin smaran kara | koti kulen uddhara | bhav tara bapaho
सत्य ज्योतिलिंग बारा । प्रातःकाळीं स्मरण करा । कोटि कुळें उद्धारा । भव तरा बापहो ॥ १ ॥ वाराणसी विश्वनाथ । मोक्षदाता तो समर्थ । पुरवील अंतरीचें आर्त सोमनाथ । सोरटी ॥ २ ॥
sikka jayacha ahe thor | hatin patakancha bhar
सिक्का जयाचा आहे थोर । हातीं पताकांचा भार ॥ १ ॥ भजन होय स्थळोस्थळीं । अवघी संत हे मंडळी ॥ २ ॥
surya ase gaganin | pari disato jivanin
सूर्य असे गगनीं । परी दिसतो जीवनीं ॥ १ ॥ मेघ असतो अंबरीं । पाणी पडे भूमीवरी ॥ २ ॥